Wednesday, January 23, 2013

सुभाषचंद्र बोस जयंती


                                                               सुभाषचंद्र बोस




सुभाषचंद्र बोस ऐक ज्वलंत आणि धगधगत व्यव्तिमत्व. आज त्यांची जयंती.ते भारतीय स्वतंत्रलढयातील अग्रेसर नेते होते. ते नेताजी या नावाने ओळखले जातात.सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७ रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. भारतीय स्वतंत्रलढयात त्यांचे योगदान हे महत्वपूर्ण आहे. हे विसरुन चालणार नाही. दुसरे महायुद्ध सुरु असताना त्यांनी जपानची मदतीने आझाद हिंद फौज र-थापन केली. त्यांनी दिलेला जय हिंद चा नारा पुढे राष्ट्रीय नारा बनला. नेताजींचा प्रभाव आणि योगदान ईतके मोठे होते की, जाणकार मानतात जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असले तर भारताची फाळणी न होता भारत एकसंघ राष्ट्र म्हणून राहीला असता.  स्वत: गांधीजी देखील हेच मानत असे. लहानपणी, सुभाष कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाष मधली सुप्त देशभक्ती जागृत केली.

वयाच्या १५ व्या वर्षी, सुभाष गुरूच्या शोधात हिमालयात गेले हाते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.

महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ति दिसून येत असे. कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. म्हणून सुभाष ने महाविद्यालयात संप पुकारला होता.

१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार देऊन त्यांनी राजीनामा दिला व ते मायदेशी परतले.
१९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून,पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडूनवसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. अखेरवसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला एक वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे, १९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.

जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले. आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

मे ३, १९३९ रोजी, सुभाषबाबूंनी कॉंग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना कॉंग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला.

दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले. नंतर त्यांनी तेथून पलायन केले

  •  बेपत्ता होणे आणि मृत्यूची बातमी

 दुसर्या महायुद्धात जपान चा पराभव झाल्या कारणाने दुसरी कडून मदत मागणे रास होते म्हणून नेताजींनी रशिया कडून मदत मागायचे ठरवले

ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.

ऑगस्ट २३, १९४५ रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट १८ रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमिवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

स्वातंत्र्यनंतर, आपल्या सरकारने १९५६ आणि १९७७ मध्ये सरकारने या घटनेची चौकशी साठी एका आयोगाची नियुक्ती केली पण तेव्हा तसाच निष्कर्ष काढण्यात आला. १९९९ साली मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. २००५ साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की १९४५साली तैवानच्या भूमिवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. २००५ मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.

ऑगस्ट १८, १९४५ च्या दिवशी नेताजी कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरीत रहस्य बनले आहे.

नितिन मोरे

Sunday, January 20, 2013

प्रोब्लेम



             प्रोब्लेम म्हणझे काय मित्रानो? मित्रानो प्रोब्लेम हे सर्वांनाच असतात. पण त्यातून वाट काढणे हि महत्वाची  गोष्ट  असते. प्रोब्लेम हि अशी  गोष्ट आहे तिचे अनेक समस्यान मध्ये रुपांतर होऊ शकते. आपण पाहायला गेलो तर घरातली गृहिणीच पहा ना रोज सकाळी उठते आणि ती तिच्या नवर्यासाठी आणि मुलांसाठी  टीफीन बनवते. मुलांना  शाळेत जाण्यासाठी तयार करते  तेवढयात नवरा बायको कडून रुमाल मागतो आग ये रुमाल दे ग, घड्याळ दे ग अश्या आर्त स्वरात नवरा बायको कडून एक - एक मागण्या करत असतो. आणि ती गृहिणी  त्याच्या मागण्या पूर्ण करत असते. आणि ती गृहिण सर्वांचे काम आवरून मग स्वतः कामाला देखील  जाते. सकाळ मग चीड - चीड करते आणि बोलते तुम्हाला तर काही करायला नको मुलांना शाळेत सोडून यावे याचे काही नाही नुसते तुम्हाला चहा ढोसायला हवी आणि पेपर वाचायला हवे अशे काहीसे  चित्र  लग्न झालेल्या  काहींच्या  घरी दिसते याला काही अपवाद नाही.
         प्रोब्लेम ह्या जगात कोणाला नाही आपल्याला त्याला फेस करता आले पाहिजे. २१ व्या शतकात तर मुली ह्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून शिकत आहेत आणि त्या हि स्वताच्या पायावर उभ्या आहेत. अगदी पाहायला गेलो तर १७ व्या आणि १८ व्या शतकात अर्रेंज पद्धतीने लग्न होत असे म्हणून त्या काळात लग्न झालेल्या जोडप्यान मध्ये एवढे प्रोब्लेम नव्हते ते एकमेकान वर अतोनात प्रेम करत असे पण ते समजाच्या चौकटीत सीमित असत.ते लोक त्याचा गयावया कुठेच करत नसत. कारण तेव्हा कोण एवढे शिकलेले नव्हते त्यामुळे नवरा काही हि बोलला तर मुली मुग गिळून गप्प बसत असे आणि नवरा जे काम सांगेल ते निमूट पणे  करत असे. त्यामुळे एवढे प्रोब्लेम होत नसे आता ह्या २१ व्या शतकात सर्व जन पुढारलेल्या देशाचे अनुकरण करू लागले आहेत. आणि प्रेमविवाह करतात त्यामुळे ते लग्न जास्त काल टिकत नाही आपला जोडीदार आपल्याला जरा तरी काही बोलला तर त्याला प्रतिउत्तर करायचे आणि बायकोने काही बोलले तर नवर्याने प्रतिउत्तर करायचे.ह्या मधून कधी कधी वाद घटस्पोटा पर्यंत पोहचतो. मुळात पाहायला गेलो तर  दोघाच त्या कारणाला जबाबदार असतात. त्यामध्ये एकही जन समजून घेत नाही त्यामुळे हाप्रकार होतो. माझ्या मते संसाराचा गाडा हाकताना जोडीदारा मधले एक तरी व्यक्ती समजूतदार असायला हवी.तर हे प्रोब्लेम कधीच उदभवणार  नाहीत . म्हणजे आताच्या जगात समजूत दार पणा हा लोप पावत जात आहे असे मला वाटते. तरीही बोटावर मोजण्या इतकी काही जोडपी आहेत बरे का ते आपल्या पार्टनरला समजून घेतात आणि तिला तिच्या घरातल्या कामात मदत करतात. जर असा समंजस पणा सर्वान मध्ये उतरला तर  जीवनात कधी प्रोब्लेम येणारच नाहीत. प्रोब्लेम ह्या नावावर  फुल्ली मारून  आपण आपले जीवन सुख आणि समृद्धी करू शकतो.



                                                                                                 - Ni3more
                                                 

Friday, January 18, 2013

आमची मुंबई...'सुरक्षित' मुंबई...?


          
                                                                              
                                                                          
                                                आमची मुंबई सुरक्षित मुंबई आहे का?
           'मुंबई" एक स्वप्नांची नगरी.या नगरीत जगण्याचा सर्व जण काटेकोरपणे प्रयत्न करत असतात. 'मुंबई' हि आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. या राजधानीत पोटाची खळगी भागवण्यासाठी देश भरातून लोक येथे प्रस्थान करतात. जेणेकरून येथे पुरेसा कामधंदा उपलब्ध होत असल्याने लोक या स्वप्नांच्या नगरीची वाट धरतात. पण आपण पाहायला गेलो तर या मुंबईत रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने परप्रांतीयांचे एवढे लोंढे दिवसेंदिवस या स्वप्नांच्या नगरीत प्रस्थान करतात. एवढी प्रचंड गर्दी वाढली आहे, की विचारयला नको. म्हणून तर प्रत्येक जण या स्वप्नांच्या नगरीत फक्त एकाच स्वप्न घेऊन येतात , 'मुंबई' म्हटले तर CID फिल्म मधले हे गाणे आठवते  ये दिल ही मुश्किल ही जीना याह, जरा हट  के, जर बच के  येह बोम्बय मेरी जान !!!. याच स्वप्नांच्या नगरी मध्ये प्रत्येक जण मोठे - छोटे काम करण्याच्या उद्देशाने मुंबईत येत असतो पण आपण ह्याचा कधी विचार केला आहे का मुंबईत एवढे परप्रांतीय लोंढे वाढले आहेत की त्यामुळे मुंबई मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.  मुंबई हि खरच सुरक्षित आहे की नाही हे म्हण्याची वेळ आली आहे .
            याच धर्तीवर पाहायला गेलो तर आताच थोड्या दिवसापूर्वी राजधानी दिल्लीत बसमध्ये एका २३ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराने आणि अत्त्याचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरच कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त उशिरा पर्यंत घराबाहेर पडणाऱ्या मुली, तरुणी, महिला सुरक्षित आहेत का...? रात्री अपरात्री त्या मुंबईत बिनधास्त फिरू शकतात का...? घराबाहेर सोडा , निदान आपल्या घरामध्ये तरी महिला सुरक्षित असतात का...? त्याचाच घेतलेला हा एक आढावा.
          राजधानी दिल्लीत एका २३ वर्षीय तरुणीवरील सामुहिक बलात्काराच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली असताना राजधानी दिल्लीची मान शरमेने खाली टाकणारी घटना घडली. फेसबुकच्या माध्यमातून जाळ्यात ओढून एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला ३१ च्या रात्री हा प्रकार घडला. दोघेही आरोपी उच्चशिक्षित आहेत. दिल्लीत दहा दिवसापूर्वी एका तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाने देश हादरला असतानाच आणखी एक घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशात एका ४२ वर्षीय महिलेवर तीन पुरुषांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली अश्या किती तरी घटना  घडल्या आहेत. पाहायला गेलो तर ज्या घटना घडल्या आहेत त्या वेगवेगळ्या राज्यात घडल्या आहेत आणि सर्व राज्याचा विचार करायला गेलो  तर माझ्या मते मुंबई ही ईतर राज्यांपेक्षा सुरक्षित राज्य आहे. 
मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने साहजिकच येथे महिलांचे काम करण्याचे प्रमाण खूप आहे.  कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त उशिरा पर्यंत घराबाहेर असणाऱ्या मुली, तरुणी, महिला सुरीक्षित आहेत का...? रात्री अपरात्री त्या मुंबईत बिनधास्त फिरू शकत नाहीत आणि घराबाहेर सोडा त्या आपल्याच घरामध्ये सुरक्षित नाही आहेत. त्याचेच उदहरण पहिले तर हल्लीच डोंबिवलीत माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य घडले. डोंबिवलीत एका मुलीवर तिच्याच वडिलांनी आणि भावानी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. खरच मुली, स्त्रिया बाहेरच काय तर आपल्या घरात देखील सुरक्षित नाही आहेत.
       महिलांवर होणारे अत्याचार, विनयभंग, छेडछाड अशा निषेधार्ह घटनांचे प्रमाण संपूर्ण समाजच गावगुंडांच्या पातळीवर येऊन पोहचला असावा अशी शंका येण्याइतपत वाढले आहेत. केवळ सार्वजनिक ठिकाणी महिला पोलीस तैनात करून या गावगुंडाना धाक बसणार नाही. अत्यंत कठोर कायदा आणि आजामीनपात्र गुन्हा यामुळेच अशा वासनांधांना जरब बसू शकेल. मुक्या म्हणजे स्त्रियांनी, ज्यांना आमचे जुने लोक 'अबला' म्हणतात, त्यांनीच आता 'सबला' होऊन अशा गाव गुंडांना धडा शिकवणेही तितकेच गरजेचे आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:' अशा अर्थाचे एक संस्कृत वचन आहे. याचा अर्थ 'जेथे महिलांना सन्मान केला जातो, स्त्रीला पूजनीय मानले जाते तिथे देवतांचा निवास असतो. आपल्या देशात स्त्रीयाबाबत बोलताना नेहमीच हे वाक्य ऐकवले जाते, त्याचप्रमाणे ते अनेक ठिकाणी वाचनातही येते. दुर्देव असे कि अशा प्रकारचे वाक्य आपल्या बोलण्यात किवा ऐकण्यात सातत्याने येत असते तरी ते आचरणात मात्र येत नाही. आपल्याकडे काय होते तर, महिलांचे शोषण, ताडन, तिच्यावर अत्याचार, मारहाण, लंपटगिरी, विकृत शेरेबाजी. अलीकडच्या काळातील घटना पहिल्या तर लक्षात येते कि, वासनांध विकृतांच्या या टोळ्यांकडून तरुण मुलीही लक्ष्य होतात आणि अगदी साठीतल्या ज्येष्ठ महिलाही. भर रस्त्यातही हे सुरु असते आणि बंद दाराआडही अश्या महिलांचे अनेक हुंदके पदरचे बोळे तोंडात कोंबून दाबले जातात. कुटुंबियांकडून, वडीलधार्यांकडून, नातेवाईकांकडून, शिक्षकांकडून होणारे लैंगिक शोषण तर मृत्यू परवडावा इतके लज्जास्पद. लहान मुलीही या विकृत कामुकांच्या  चाळ्यांची शिकार बनतात, नकळत्या वयात वडिलांकडून त्यांचे लैंगिक शोषण होते हे 'मेरा भारत महान' म्हणणाऱ्या कुणालाच लांच्छनास्पद वाटत नाही. ऑनर किलिंगच्या घटनांमध्येही महिलाच लक्ष्य बनते. मग कोलकात्यात कुणी भाऊच जिचे रक्षण कार्याचे त्याच बहिणीचे मुंडके धडावेगळे करतो, कुठे आई वडील मुलीचा गळा दाबतात. केरळमध्ये सहा वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण वडिलाच करतात, डोंबिवलीत सडकछाप मुले त्यांच्या शेरेबाजीला विरोध करणाऱ्या मित्रालाच खलास करतात, पवईत ज्येष्ठ महिलेवर अत्याचार केला जातो... अशा कितीतरी घटना. नकळत्या वयातील अशा घटना मनावर कायमचे ओरखडे उठवतात, मानसिक आणि वर्तन समस्यांना कारणीभूत ठरतात. खेळण्याबागडण्याच्या वयात आपले लैंगिक शोषण होते आहे हे कळण्याचीही समज  आलेली नसते. अशा किती जणी उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि होत आहेत. मंदिरामध्ये स्त्रीशक्तीची देविस्वरुपात पूजा होते आणि सार्वजनिक ठिकाणी, अनेक घरांच्या बंद दाराआड मात्र तिची विटंबना, उपेक्षा सुरु असते. पुरुषप्रधान संस्कृतीत हा दुटप्पीपणा  पिढ्यानपिढ्या सुरु आहे. आजची स्त्री कितीही सुशिक्षित असली, स्वताच्या पायावर उभी असली तरीही तिला अशी हीन वागणूक मिळावी ही दुर्दैवी बाब आहे. विचार मनाला अस्वस्थ करणारे हे वास्तव चित्र भयानक आहे. स्त्री म्हटली की, ती कमकुवत किवा दुय्यम मानण्याची मानसिकता अजूनही बदलत नाही. संस्कृतीत स्त्री पुज्य मानणे आणि प्रत्यक्षात तिला केवळ भोग्य वस्तू समजून तिची अशी मानहानी होणे, अशा प्रकारच्या संतापजनक विरोधाभास दुर्दैवाने आपली सामाजिक ओळख बनला आहे. घरापासून शाळा-महाविद्यालया पर्यंत आणि अगदी कार्यालया पर्यंत महिलांशी दुय्यम व्यवहार केला जातो. या सगळ्याला सारवलेल्या पुरुषांना यात काही चुकते आहे, असेही वाटत नाही. मुलगा हा वंशाचा दिवा आणि मुलगी हे परक्याचे धन मानण्याची पद्धत आपल्याकडे आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेप्रमाणे मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो. त्यासाठी  आपल्या समाजानी आणि आपण आपल्या विचारा मध्ये बदल करून स्त्री आणि पुरुष यांना समानतेने वागवले पाहिजे. जेणे करून हे भेद निर्माण होणार नाहीत
        भारतीय तत्वानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी दुसर्या बाजूला टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदुमध्ये ज्ञान, कल्पना देणारी महासरस्वती अश्या प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरुष दैवतांची केली जात असली तरी चर्चा होते ती त्यांच्या असलेल्या स्त्री शक्तीची. तरीही आज समाजात स्त्री च्या पोटात मुलगी आहे हे काळल्यावर तिला या जगात येऊन दिले जात नाही आणि येऊन दिले तर त्या आईचा मानसिक आणि शारीरक  छळ केला जातो किवा त्या जन्मलेल्या  मुलीला एखाद्या कचर्याच्या डब्यात किवा गटारात सोडून दिले जाते. अश्याच एक घटना मागे कल्याण मध्ये घडली होती. खरच पाहायला गेलो तर एक स्त्रीच एका स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक  छळाला कारणीभूत असते त्यामुळे आज स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. एकी कडे स्त्री ला देवी म्हणून तिची पूजा अर्चा करायची आणि तिचा मानसिक आणि शारीरक छळ करायचा खरच हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार अजून ही आपल्या महाराष्ट्रात घडत आहे. या वर सरकारने कितीही कायदे केले तरी अश्या घटनान मध्ये दिवसेंदिवस  झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. स्त्रिया कितीही शिकलेल्या असल्या तरी त्यांना स्त्रियांना शारीरिक , मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. आणि त्या निमूट पणे सहन करत असतात. हल्ली मुंबई लोकल मध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार वाढले असतानाच  मागेच चर्चगेट-बोरीवली लोकल मध्ये एका मुलीला लोकल रोमियो कडून चाकूचा धाक दाखवण्यात आला आणि तिची लुट करण्यात आली. तसेच दिवसेंदिवस वृद्धांवर होणारे हल्ले आणि अत्याचार यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणे वाढले आहेत. डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या घटनेने महिलावरील अत्याचारांनी कळस गाठल्याचे सिद्ध झाले आहे.गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनां मध्ये बरीच वाढ झाल्याचे दिसले आहे.गेल्या वर्षभरात ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत १०६ बलात्कार १९८ विनयभंगाचे प्रकार घडले आहेत.एकीकडे अशा गुन्ह्यांची संख्या वाढली असली तरी हत्येचे गुन्हे मात्र कमी झालेत. सन २०११ मध्ये १२७ हत्यांनी ठाणे जिल्हा हादरला होता. मागील वर्षी ही संख्या ११० इतकी नोंदवली गेली.
           दिल्लीत ज्या २३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला त्या घटनेने संपूर्ण देश हादरून  गेला असून जागोजागी आंदोलने आणि निर्दशने करण्यात आली ह्याच पार्श्वभूमीवर सरकारने बलात्कार करणार्यांवर फास्ट ट्रक कोर्ट स्थापन करून त्याची जलद गतीने चौकशी करावी असा दबाव संपूर्ण जनसमुदायाकडून सरकारवर टाकण्यात आला. पण या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण होत असताना महिलांवरील अत्याचाराची गंभीर दखल घेऊन सरकारने अधिकाधिक कडक कायदे करावेत, यासाठी आंदोलनांचा भडका उडाला असला तरी अश्या सर्व स्फोटक वातावरणात आमची मुंबई, 'सुरक्षित' मुंबई नाही आहे कारण दिवसेंदिवस येथील वृद्धांवर, महिलांवर, मुलींवर होणारे अत्याचार हे कधीच थांबणार नाहीत कारण आपण आज ज्या एकवीस साव्या शतकात वावरत आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीवर पाश्चिमात्य देशांचा एवढा प्रभाव पडला आहे कि आपण त्या पुढारलेल्या आणि पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करत आहोत. चित्रपटान मध्ये वाढलेले अश्लीलीकरण ह्याला कारणीभूत आहे. हल्लीच एका नेत्याने वक्तव्य केले कि पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करून आजची पिढी वाया गेली आहे.
                       माझ्या मते, दिल्ली, उत्तर प्रदेश, हैद्राबाद,पुणे या राज्या पेक्षा थोडी तरी सुरक्षित आहे.  कारण मुंबई मध्ये कोणीही केव्हाही अपरात्री फिरू शकतो. पण सध्या राजधानी दिल्लीत बसमध्ये एका 23 वर्षीय तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरून गेला आहे. पण त्यामुळे आता मुंबई ही मुलींसाठी सुरक्षित आहे हे सांगता येणार नाही. पाहायला गेलो तर मुली हि काही प्रमाणात ह्याला जबाबदार आहेत. प्रत्येकालाच आपल्या मनाप्रमाणे वागण्याचा, फिरण्याचे स्वतंत्र, हवे तसे कपडे घालण्याचे स्वतंत्र  आपल्या राज्य घटनेने दिले असले तरी स्त्रियांनी व मुलींनी आपल्याला शोभेल असेच कपडे परिधान करावे जेणे करून मुल आकर्षित होणार नाहीत. मुलींनी आपल्या स्व:स्वरक्षणासाठी त्यांनी आपल्या जवळ चाकू, मिरची पूड, स्प्रे स्वतः जवळ ठेवावा जेणे करून अशी वेळ आली तर आपण आपले स्वतःचे स्व:रक्षण करू शकतो.
     

 याच पार्श्वभूमीवर आपली मुंबई ही सुरक्षित आहे की नाही त्याबद्दल घेतलेल्या प्रतिक्रिया खालील प्रमाणे

मुंबई शहरातही मुली सुरक्षित नाहीत. मात्र अन्य शहरांच्या तुलनेत पहिले तर मुंबई सुरक्षित आहे. मी स्वतः मिडिया क्षेत्रात गेली तीन वर्ष काम करीत आहे. त्यामुळे सातच्या आत घरात हि चौकात पाळणे शक्य नाही. रात्री नेहमी उशिरा घरी येण होतच. पण अद्याप मला कोणताही वाईट अनुभव आला नाही. उशिरा येताना कोणीही छेड kadhan, किवा पाठलाग करणं, विनयभंगाचा प्रयत्न असा कोणताही प्रकार माझ्यासोबत घडला नाही आणि शेजारी राहणाऱ्या कोणत्या हि मुलीवर असा प्रकार अद्याप असा घडलेला नाही. वाईट घटना सर्वत्रच गाढत आहेत पण तुलनेने मुंबई शहरात फार कमी आहेत असे माजे मत आहे. मी रात्री १२ च्या सुमारास रिक्षा न मिळाल्यामुळे जोगेश्वरी स्टेशन पासून घरापर्यंत अर्ध्या तासाचे अंतर चालत प्रवास केला आहे. मात्र आजपर्यंत मला काही समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळे आमची मुंबई सुरक्षित मुंबई नक्कीच आहे.
                                                                     -वैजंता गोगावले, उपसंपादक, दै. मुंबई लक्षदीप 


महिला,मुली या मुंबई मध्ये सुरक्षित असण्या पेक्षा त्याआधी पोटात तरी सुरक्षित आहेत का? माझा प्रश्न हा आहे. बलात्कार, छेडछाड,विनयभंग, हुंडाबळी, स्त्री- भ्रूणहत्या ही तर स्त्री वर होणाऱ्या अत्याचाराची यादीच आहे. स्त्रीच्या पोटात स्त्रीच्या पोटात मुलगी आहे हे कळल्यावरती तिला या जगात येवून देत नाही जरी येऊन दिले तर तिचा आईचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो . स्त्रीचे चारित्र्य हे काचेच्या ग्लासा सारखे आहे. एकदा तिच्यावर शिंतोडे उडवले कि खूप बदनामी सहणार करावी लागते. मुलीना दिल्ली मध्ये चालत्या बस मध्ये त्या मुलीवर जालेला तो प्रकार सगळ्यांच्याच मनावर जखम देऊन गेला आहे.आज दिल्ली काय मुंबई हि मुलींसाठी सुरक्षित नाही आहे.
                                                                              -  प्रिती सरदेसाई,  (ज्युनिअर असोसिएट)

बलात्कारसारखे प्रकार कुठेही घडू शकतात. त्यामुळे अमुक एक ठिकाणच स्त्रियांच्या दृष्टीने सुरक्षित आहे का ह्या प्रश्नाचे उत्तर देत येण कठीण आहे. फक्त मुंबईतच कशाला माझ्या मते कोणत्याही ठिकाणी रात्री अपरात्री एकटीने बहरे पडताना कोणतीही स्त्री कचरते. दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणाने देश खडबडून जागा झाला. डोंबिवलीच्या एका मुलीवर तब्बल २ वर्ष तिच्याच वडिलांनी आणि भावाने होणार्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक घटना समोर आली. या अशा घटना पाहता स्त्रिया आपल्या घरीच सुरक्षित नाही आहेत. बलात्कार सारख्या अक्षम्य गुन्ह्यासाठी कडक शिक्षा हवीच पण त्याच बरोबर पुरुषांना योग्य समुपदेशाची गरज आहे. मुलांना लैंगिक शिक्षणाचे योग्य ते शिक्षण दिले पाहिजे.                                                                                                
                                                                                                   - प्रणाली पवार,  डोंबिवली



नितीन मोरे 

Monday, January 14, 2013

प्रेमकविता - जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!


जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!       

                               
                                                                           

                                                            रात्र होती अशी 
                                                           आहे साक्ष तिची 
                                                           होती जवळी म्हणून 
                                                           जीव होता मुठी 
                                                            ध्यास लागी जीवा 
                                                            छंद होता तुझा 
                                                   जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!! 
                                           
                                                  आत होता तुझ्या भावनाचा सडा
                                                          तू सांगणार कश्या 
                                                        तुझ्या भावनांचा सडा 
                                                          मी नव्हतो जेव्हा 
                                                           तुझपाशी जेव्हा  
                                               राहिलीस कशी माझ्या वाचून जीवा 
                                                       म्हणून छंद होता मला 
                                               जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!

                                               मी होतो जेव्हा ऑफिसात तुझ्या 
                                                      जीव होता तुझा तेव्हा  
                                                मी होतो तेव्हा ऑफिसात तुझ्या 
                                                     तेव्हा पासून तु साठवून
                                                     ठेवला आठवणीचा सडा 
                                                मी अचानक सोडून गेलो जेव्हा 
                                                   याद आली माझी तुला 
                                                     जवळ नव्हतो तेव्हा 
                                                        याद आली तुला 
                                               जीवनाशी असा मार्ग आहे तुझा !!!
                                                          छंद होता तुझा 
                                                         याद आली तुला 
                                             जीवनाशी असा मार्ग आहे तूझा !!!


                                                                                                            Created By 
                                                                                                               ni3more

मकरसंक्रांत !!!!!



                                           
                             

             महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहतात. तो सण म्हणजे मकरसंक्रांत ! मकरसंक्रांत हा भारतातील शेती संबंधित सण आहे. सुर्य ज्या दिवशी दक्षिणायातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथिला मकरसंक्रांत साजरी केली जाते. यादिवशी सुर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. यादिवसापासून सुर्याचे उत्तरायण सूरु होते.पृथ्वीवरुन पाहिले असता सुर्याची उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.
सूर्याच्या संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकारासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगळ्या असतात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते व दुसऱ्या दिशेला जाते. त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते हा सण सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. यास भोगी, संक्रांती व किंक्रांती असे म्हणतात.संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाणवाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात. इंग्लिश भाषा महिन्यानुसार हा दिवस १४जानेवारी रोजी येतो. परंतु दर ७० वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते.
 मकरसंक्रांती  येण्याची चाहूल लागताच सर्वत्र लाडवाचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक आनंद पसरतो. काही काही घरात तर गृहिणी आवर्जून तिळाचे लाडू बनवतात . संक्रांतीला तिळाचे लाडू खाण्यामागे अजून एक शास्त्रीय कारण आहे.तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे. स्निग्ध म्हणजे प्रेम म्हणून ह्या दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात आणि वाटले जातात. हा सण थंडीत येतो. थंडी मध्ये अंगात उष्णता निर्माण व्हावी आणि  तिळामध्ये उष्णता असल्याने ह्या सणाला तिळाचे लाडू बनवले जातात. या सणाला सर्वत्र वेगवेगळ्या रंगाचे पतंग उडविले जातात. लहान मोठे सर्वच जन पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटतात.


                                            तुम्हा सर्वाना मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा
                                                      तिळगुळ घ्या गोड गोड बोल !!!

      




                                                                                                   - Ni3 more

Tuesday, January 8, 2013

स्त्री - पुरुष समानता आणि त्यांचे प्रश्न?


सुरुवातीला माणूस एकत्र टोळीने वावरत असे. शिकार करून तो आपली भुक भागवत असे. शिकार केल्यानंतर तो जे शिकार केलेले मांस सारख्या पद्धतीने सर्वान मध्ये वाटत असे. मांस तो जास्त वेळ टिकवू आणि साठवू शकत नव्हता . मग प्रामुख्यांनी माणसाच्या डोक्यात कल्पना आली कि शेती करूया मग माणूस पारंपारिक पद्धतीने शेती करू लागला आणि त्याचा योग्य प्रकारे साठा करू लागला. या शेतीसाठ्यावर पुरुषाने आपल्या मसल पॉवर ने  प्रभुत्व दाखवू लागला. पुरुषाच्या मालकी हक्काला स्त्रियांनी कधीच विरोध दाखवला नाही आणि इथेच स्त्री- पुरुष समानतेला तडा गेला. 
            यानंतर वैदिक काळात शिक्षण- आयुष्यभर शिक्षण घेणं किंवा वयाच्या १६व्या वर्षापर्यंत शिक्षण घेणं २. कुटुंब संकल्पना- यामध्ये स्त्रीने चारित्र्य, शील, संस्कृती सांभाळायची. म्हणजे स्त्रियांनी सोवळे ओवाळे उपवास एकट्या स्त्रीनेच करायचे. पोथ्या वाचायच्या.एका पोथीत स्त्रीला असलेल्या मासिक पाळीच्या काळात तीने पोथी ऐकली की तीच्यासाठी चांडाळणी इ. शब्दांचा प्रयोग केला आहे. हे शब्द पुरुषांसाठी का नाहीत. जर एखाद्या या संकल्पनेचा विकास झाला हेच एकट्या स्त्रियांनी का करावे पुरुषाने का करू नये इथेच स्त्री - पुरुष समानतेला तडा गेला. 
आपल्या समाजाची मानसिकताच बघा ना जर एखाद्या पुरुषाची बायको मरण पावली तर त्याला लगेच त्याचे नातेवाईक (समाज) बोलतो आता तुला जेवण कोण बनवून घालणार, मुलांना कोण सांभाळणारपण हेच प्रश्न स्त्रीला कोणी विचारात नाही.  मग तो पुरुष लगेच सहा महिन्यात लग्न करून मोकळा होतो. पण तेच एखाद्या स्त्री चा नवरा मरण पावला तर बोलतात तू  आता राहणार कशी आणि मुलांना सांभाळणार कशी तू बाहेर जाऊन काम करणार कशी  तुला तर सवय नाही आहे तर तिला कोणीच बोलत नाही कि तू दुसरे लग्न कर तू  हीच आपल्या समाजाची मानसिकता आपण बदलली पाहिजे. 
अजूनही आपल्या जगात पुरुष प्रधान संस्कृती वावरत आहे. तर त्या ५० टक्के स्त्री आरक्षणाचा किती उपयोग होतो आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे.
उदा. रमाबाई रानडेंच्या सिरीयलमध्ये असं दाखवलं आहे की, त्यांची आत्या शिकली म्हणून तिचा नवरा वारला यामुळे त्यांची पूर्ण स्त्री पिढी शिकली नाही.आपण पाहायला गेलो तर आपल्या समाजाची अशी मानसिकता आहे कि एकट्या स्त्रीनेच घर सभांळायचे आणि २४ तास मोलकरणी सारखे घरात राबायचे. आणि त्यासाठी तिला कोणी पगार देत नाही. स्त्री  नवर्याचा पगार स्वतः साठी किती वापरते , जगात फक्त २ भेद स्त्री आणि पुरुषभेद असायला हवे कारण पुढचं जग चालायला हवं. कोणीही एकटं हे जग चालवू शकत नाही. 
त्यामुळे ह्याच काळात स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार होत असे स्त्री ने बहुपत्नीकत्व, सती पद्धत, बायका ठेवणं, रामबाईचे लग्न वयाच्या १२ व्या वर्ष झाले तरी लग्न ठरत नव्हते तर त्यांच्या आई वडिलांना टेन्शन आले होते.त्याकाळात अगदी ५० वर्षाच्या माणसाबरोबर सात - आठ वर्षाच्या मुलीचे लग्न लावले जात असे. पण ती त्याकाळची गरज होती कारण त्याकाळी मुलीना उपभोगाची वस्तू  म्हणून मानले जात असे. तर हीच मानसिकता आपल्याला आता बदलयला हवी.           इंग्रज  भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले. ठराविक ठिकाणी ठराविक पिकवा ह्या त्यांच्या धोरणाने येथील शेती व्यवस्था आणि समाजरचना कोलमडून पडली आणि जिथे कारखाना तिथे लोक स्थलांतरित होऊ लागली. त्यामुळे शिक्षणाची गरज भासू लागली इंग्रजांना त्यांच्या देशातून शिकलेली माणसं इथे काम करायला आणावी लागत असे म्हणून इथल्याच लोकांना इंग्रजी भाषा यावी म्हणून शिकण पद्धती आणली. त्याचाच प्रसार होऊन, पुण्यात १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू झाली. इंग्रजांनी स्वत:च्या स्वार्थासाठी शिक्षण सुरू केलं. त्यानंतर १९४७ साली देश स्वतंत्र झाला त्यानंतर आतापर्यंतची स्थिती कशी आहे, स्त्री पुरुष समानता आहे का, काय वाटतं, पुरुषाने मुलं झाली म्हणून करियर सोडलं का, लिंग तपासण्यासाठी १०००रु. घेतले जातात. आपल्याकडे लग्न व्यवस्था  कशी आहे, जात, पगार, नोकरी, जेवण येतं का  यांविषयीचे प्रश्न विचारले जातात. त्याऐवजी एकमेकांच्या आवडीनिवडी विचारायला हव्यात. कारण लग्न व्यवस्थेमुळे दोन घरे एकत्र येतात. तसेच लग्नानंतर काही वर्षांत बायको  मरण पावली तर  तू आता कसं सांभाळणार मुलांना, तुला जेवण करून कोण घालणार असे प्रश्न त्याला विचारले जातात हे प्रश्न स्त्रीला कोणी विचारत नाही. शिवाय पुरुष सहा महिन्यांच्या आत लग्न करून मोकळाही होतो. तसं स्त्रीचं नाही ती मात्र आयुष्यभर नव-यानंतर मुलांना मरेपर्यंत सांभाळते. यावरून स्त्री ही अबला नाही तर सबला आहे सबला नसती तर स्त्रीने नव-यानंतर मुलांना मरेपर्यंत मोठं केलं नसतं.
           आज ८० टक्के स्त्रिया या शिकलेल्या आहेत आणि त्या घरातच बसून आहेत. विकास आणि वाढ ह्या परस्पर दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपली वाढ हि होत असते आणि ती आपण थांबवू शकत नाही आणि विकास थांबवू शकतो किवा करू शकतो. आजच्या कलियुगात माणूस फक्त आपला आणि आपलाच विचार करतो बाकीच्या कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही. कुठे एकीकडे बलात्कार झाला ना तर आपण विचार करतो त्या मुलीवर बलात्कार झाला ना आपल्या आया आणि बहिणीवर झाला नाही ना हि समाजात  पसरत चाललेली मानसिकता आपल्या बदलयला हवी नाही तर आपण नुसते बोलयाचे भारत माझा देश आहे आणि सारे बांधव माझे भावू - बहिण आहेत आहे ते का थुंकण्यासाठी ? म्हणून आपण सर्वांनी स्त्रीयांन कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलयला हवा आणि आपण सर्वांनी विचार केला तर जे ५० टक्के आरक्षण महिलांना दिले आहे त्याचा पुरेपूर वापर होत आहे का ? ते हि पहिले पाहिजे आणि आपली पुरुषप्रधान संस्कृतीत  स्त्रियांना आपण स्त्री - पुरुष समानतेचा समान हक्क देत आहोत का ह्याचा हि आवर्जून आपण आणि आपल्या पत्रकारांनी विचार करावा? 

 -ni3more