Wednesday, February 27, 2013

...!!!आमुची मायबोली !!!...


...!!!आमुची मायबोली !!!...
मराठी असे आमुची मायबोली जरी
आज ही राजभाषा नसे,
नसो आज ऐश्वर्य या माउलीला,
यशाची पुढे दिव्य आशा असे,
जरी पंचखण्डांतही मान्यता घे
र-वसत्ताबळे श्रीमती इड.ग्रजी,
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा
तिच्या, तीस केवी त्यजी?

 जरी मान्यता आज हिन्दीस देई उदेलें
नवे राष्ट्र हें हिन्दवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची
जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं उत्तरीं वा असूदक्षिणिं
दूर तन्जावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी.

मराठीअसे आमुची मायबोली जरी
भिन्नधर्मानुयायी असुं,
पुरी बाणली बन्धुता अन्तरड्.गी, हिच्या
एक ताटांत आम्ही बसूं; 
हिचे पुत्र आम्हा हिचे पाड्.ग फेडूं , वसे 
आमुच्या मात्र हन्मन्दिरी,
जग न्मान्यता हिस  अप्रू प्रतापे हिला 
बैसवू वैभवाच्या शिरी.

हिच्या लक्तरांची असे आज आम्हा,
नका फक्त पाहू हिच्या लक्तरं 
प्रभावी हिंचे रूप चापल्य देख पदवी 
फिकी ज्यापुढे अप्सरा;
न घालू जरी वाड्मया तील उंची हिरे 
मोतियांचे हिला दागिने,
मराठी असे आमुची मायबोली, वृथा हि 
बढाई सुकार्याविणे.
मराठी असे आमुची मायबोली, अहो,
पारतंत्र्यात हि खड्.गली,

हिची थोर संपती गेली उपे क्षेमुळे खोल 
 कालार्णवाच्या तळीं,
तरी सिन्धु  मन्थुनि  काढुनि रंत्ने नियोजूं
तयांना हिच्या  मण्डनीं-
नको रीण ! देवोत देतील तेव्हा जगांतील 
भाषा हिला खण्डणी.
                   
                          -माधव जुलियन 



Tuesday, February 26, 2013

....!!! मराठी राजभाषा दिन !!!...


..!!! मराठी राजभाषा दिन !!!...


आपल्याला अगदी परिचयाचे आणि जवळचे मराठी लोकप्रिय कवी , लेखक, समीक्षक व नाटककार विष्णु वामन शिरवाडकर म्हणजे  कुसुमाग्रज यांचा उद्या जन्म दिवस. ते मराठीतील एक आत्मनिष्ट व समाज निष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक मानले जातात. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने आपले लेखन केले.ते सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्या नंतर यांच्यानंतर मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक होते. त्यांनी दिलेले योगदान पाहून त्यांचा जन्म दिवस हा 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.
आपण मराठी माणसांनी कधी विचार केला आहे का आपली मराठी भाषा का लुप्त होत चालली आहे जर हा भाषादिना दिवशी मी घेतलेला आढावा अठराव्या शतकात इंग्रज आले.इंग्रज आपल्या देशात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले. आपला देश हिंदू भाषिक असल्याने त्या काळात आपल्या इथे मराठी भाषा आणि हिंदी  भाषा सरास बोलली जात होती.  इंग्रज त्या काळी आपल्या इथे व्यापार करण्याच्या उद्देशाने आले होते आणि त्याकाळी छत्रपती शिवाजीनी महाराजांच्या आज्ञा घेऊन इथे आपल्या व्यापाराची सुरुवात केली. तेव्हा इंग्रजांनी ईर-ट इंडिया कंपनीची र-थापना केली. आपल्या ईथे मराठी आणि हिंदी बोलली जात असे. येथील लोकांना इंग्रजी भाषा यावी आणि त्यांना इथे व्यापार करणे सुलभ व्हावे म्हणून त्यांनी इथे इंग्रजी शाळा काढल्या आणि येथील लोकांनी इंग्रजी शिकावी आणि त्याचा त्यांच्या स्वार्थ साठी त्यांनी इंग्रजी भाषेचा प्रसार करायला सुरुवात केली.  तेथ पासून इंग्रजी भाषा इथे रूढ झाली  ती आजतागायत. त्याकाळात आपल्या इथे मोठ मोठे संत होऊन गेले. उदाहरणार्थ: संत तुकाराम, ज्ञानेश्र्वर, सावतामाळी, बहिणाबाई आदि. ह्यांनी त्याकाळात आपल्या मातृभाषा (मराठी भाषेचा ) प्रसार केला.पण इंग्रज आले आणि त्यांनी मराठी भाषेला डावलून इंग्रजी भाषेचा प्रसार करायला सुरुवात केली. पण आपण पाहायला गेलो तर आताच्या एकविसाव्या शतकात आपली मराठी भाषा एवढी लुप्त होत चाली आहे कि विचारायला नको . अलीकडे मराठी शाळेच्या अनुदानावरून आणि मराठी महापालिका शाळा बंद करण्याच्या बंडच काही राजकीय पक्षाने माडला होता.त्यातच आपली मराठी माध्यमाची शाळा आणि भाषा ह्या राजकीय उद्देशा पायी भरडून निघाली. सी बी एस ई , आय सी एस ई आणि इंग्रजी माध्यमिक शाळामुळे आपली मराठी माध्यमिक शाळा आणि मराठी भाषा भरडून निघाली.  आपण ह्या सर्व कडे लक्ष देवून आपली मराठी भाषा लुप्त होणार नाही आणि आपली मराठी मायबोलीचा प्रसार करण्या साठी आपण सर्व मराठी माणसांनी योग्य ते पाऊल उचलले  पाहिजे. पण अलीकडच्या काळात पाहायला गेलो तर मराठी साठी अभिमान वाटावी असे चित्रपट निघाले. तसेच हल्लीच आपल्या मराठी भाषेला आणि मराठी माणसाला गर्व वाटावा असे घडले हल्लीच स्टार प्रवाह वरचे दोन कार्यक्रम १. होम मिनिस्टर २.डान्स महाराष्ट्र डान्स  ह्या दोन सिरियल ब्रिटन मध्ये हप्त्यातून दोन दिवस त्यांच्या टिव्ही चेनल वर दाखवण्यात येणार आहेत. हि तर खरच आपल्या मराठी माणसा साठी गर्वाची बाब आहे हे आपण विचार करून आपल्या मराठी भाषेचा प्रसार करावा. आजच्या काळात इंग्रजी आपण शिकू नाय असे मी बोलत नाही पण आपण आपल्या मराठी भाषेला हि विसरून चालणार नाही. आपल्या मराठी इतिहासात मोठ मोठ्या कवींनी महत्वाचे योगदान दिले आहे हे आपण विसरून चालणार नाही. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्म दिनी आज मराठी भाषा दिन साजरा करूया.




                                                "पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
                                                आपुल्या घरात हाल सोसते मराठी
                                                 हे असे कितीक खेळ पाहते मराठी
                                                 शेवढी मदांध तख्त फोडते मराठी"                              
                                  ....!!! मराठी भाषा दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!....




-Ni3more

Monday, February 18, 2013

विंटेज अँड क्लासिक कार कलेक्शन


बिनाटपाची, मोठ्या चाकांची, तर कधी अगदीच विचित्र आकाराची...फक्त चित्रपटांत दिसणा-या या गाड्या रविवारी विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या रॅलीच्या निमित्तानं मुंबईतल्या काळाघोडा येथे अवतरल्या होत्या. अगदी स्वतंत्रत्तोर काळापासून जतन केलेल्या गाडयाचे ते आता पर्यंतच्या गाडयाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. माझे ऑफिस येथेच असल्याने फोटो काढण्याचा छंद मला आवरता आला नाही.

      
    

                                                    वेगवेगळ्या अँगलने काढलेले फोटो.

                                                                                             -  Continue of the next Part 2

 - Ni3more

विंटेज अँड क्लासिक कार कलेक्शन (Part - II )



विंटेज अँड क्लासिक कार कलेक्शन



                                                      
                                                       वेगवेगळ्या अँगलने काढलेले फोटो.

                                                                                                   

- Ni3more

Thursday, February 14, 2013

व्हॅलेंटाइन डे


                                                                     व्हॅलेंटाइन डे

                                       

        व्हॅलेंटाइन डे म्हणजे मनातील भावना ऐकांमेकांन कडे प्रेम व्यव-त करण्यासाठी अलिखित मुहूर्तच असतो. यादिवसाची  प्रत्येक जण आतूरतेने वाट पाहतो. अगदी ज्याची गर्लफ्रेंड असो वा नसो. व्हॅलेंटाइन डे पश्चिमात्यनकडून आयात केलेला दिवस आहे. पण या दिवसाचे महत्त्व दिवसेंदिवस बदलत चालले आहे. आजची तरुण पिढी याचे अनुकरण करत आहे. कॉलेज च्या तरुण तरुणीन मध्ये तर याची खूपच क्रेझ पाहायला मिळते. याचा मुहुर्त  पाहून प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज मारतो. भले होकार मिलो अथवा न मिळो, जर होकार मिळाला तर चांगलेच नाही मिळाला तर देवदास बनून फिरयला मोकळे. याच डे चा औचित्य साधून प्रत्येक तरुण तरुणी आज एकमेकाला प्रपोज करतो आणि आजचा दिवस कसा घालवायचा त्याचे प्लानिग करतो. याच दिवशी कित्येक जण याच दिवसाचा मुहूर्त साधून भटा कडून मुहूर्त काढून लग्न करण्याचा फयाड सर्वत्र रुजू झाला आहे. काही वर्ष पूर्वी या डे  ला शिवसेने   व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास मज्जाव केला होता, त्यादिवशी जो प्रेमयुगुल  दिसेल त्याचे लग्न तिथल्या तिथे करून देण्याचा चंगच बांधला होता. अश्याने प्रकारे शिवसेने कडे येणारे तरुणाची मते कमी झाली आणि कालांतराने त्यांचा व्हॅलेंटाइन डे ला असणारा विरोध हि माळवला. पण एवढा विरोध करून हि तरुण तरुणान मध्ये हा डे  साजरा करण्याचा क्रेझ अधिकच वाढीस लागला. याच दिवसाचे निमित्त साधून आजचे तरुण तरुणी  "मी तुझ्यावर प्रेम करतो" आय लव यु, विल यु मेरी मी'  असे म्हणतात.  पण या सर्वांचा आजच्या पिढीमध्ये विसर पडत चालला आहे. हल्लीच्या पिढीला व्हॅलेंटाइन डे कशाला साजरा करतात त्याचाच विसर पडणे हि लज्जास्पद बाब आहे.
.    'व्हॅलेंटाइन डे' हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत भारतीयांमध्ये अंगवळणी लागली आहे. तसेच पाहायला गेल्यास ज्या संत व्हॅलेंटाइनच्या नावावर हा दिवस आहे. त्याच्या एकूण अस्तित्वाबद्दल, व्याक्तीमात्वाबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात. गुढतेचे वलय असणार्या अशा एक नव्हे तर तीन व्हॅलेंटाइन नावाच्या संताना  कॅथलिक चर्चची मान्यता आहे. त्यापैकी रोमन सम्राट व-लाडियसने सैन्यातील शिपायांनी लग्न करू नये, असा फतवा काढला होता. अर्थात त्यामागे काही कारणे होती. सम्राटाच्या मते, ज्यांचे लग्न झालेले असते ते जीवावर उदार होऊन लढत नाहीत. परंतु संत व्हॅलेंटाइनने राजाच्या या धोरणा विरोधात जाऊन या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून देण्याचा धडाका लावला होता. राजाला व्हॅलेंटाइनच्या त्या कृतीचा राग आला. त्यामुळे चिडून जाऊन त्याने व्हॅलेंटाइन ला देहदंड दिला. ज्या दिवशी व्हॅलेंटाइन ला मरण आले, तो दिवस 'व्हॅलेंटाइन डे' अर्थात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपिया देशात रूढ झाली.पण, आजच्या युगात पाश्चिमात्यांचे अनुकरण करून प्रेम करण्याचे प्रमाण आजच्या तरुण तरुणीन मध्ये वाढीस लागलेले आहे. व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला गाठून प्रपोज करणे, कॉफी केफे डे, बरिस्त मध्ये एकमेकासमोर बसून अगदी डोळ्यात डोळे घालून आपल्या आजूबाजूच्या विश्वाचा विसर पडून आय लव यु, विल यु माय  व्हॅलेंटाइन , विल यु मेरी मी असे बोलून आपल्या प्रेमाचा हिजहार करणे.
              पण तात्पर्य एकच तारुण्याच्या ह्या धुंदीत आजच्या युवा पिढीने भुरळून न जाता नव्या नात्याला सुरुवात करताना एकमेकांना समजून घेणे काळजी घेणे. ह्या दिवशी संबंध जोडताना तुमच्या आजूबाजूला तुमचे आई वडील, सगे सोयरे - नातेवाईक कोणी नसते. लग्नाच्या ते बंधन नसतात त्या काळ्या मनी मंगळसूत्राचा गळया भोवती फास नसतो म्हणून योग्य तो विचार करून आपण " विल यु माय व्हॅलेंटाइन " बोलले पाहिजे.


Ni3 more